पल्मोनरी हाइपरटेंशन

अगदी सोप्‍या शब्‍दात उच्‍च रक्‍तदाबाचा एक प्रकार – हृदयाच्‍या उजव्‍या कप्‍प्‍यातून फुफ्फुसांकडे (फुफ्फुसीय रक्‍तवाहिन्‍या) रक्‍त वाहून आणणा-या रक्‍त वाहिन्‍यांमधील उच्‍च रक्‍तदाब (>20 mmHg) म्‍हणजे पल्‍मोनरी हायपरटेशन. फुफ्फुसीय धमनीच्‍या दाबातील वाढ इकोकार्डिओग्रामव्‍दारे किंवा अधिक अचूकपणे कार्डियाक कॅथेटरायझेशनव्‍दारे मोजली जावू शकते. (तपशील खालीलप्रमाणे) फुफ्फुसीय धमनीमधील हाई प्रेशर मुळे हृदयाच्‍या उजव्‍या बाजूचे प्रेशर वाढते. ज्‍यामुळे हृदयाच्‍या उजव्‍या बाजूचा आकार वाढतो. त्‍यामुळे हृदयाची पंपिंग क्षमता कमी होते. ( हार्ट फैल्युर ) पीएच ही – वैद्यकीय व्‍यावसायिकांसाठी अतिशय गुंतागुतीची व अनाकलनीय अशी व्‍याधी / आजार आहे. पीएच आजाराचे नुकतेच किंवा नव्‍याने निदान झालेल्‍या रूग्‍णाला पीएच –चे अचूक निदान करणारे पीएच – तज्ञ डॉक्‍टर मिळणे महत्‍वाचे आहे. पीएच – असलेला प्रत्‍येक रूग्‍ण हा भिन्‍न व एकामेवाव्दितीया (युनिक) असतो. प्रत्‍येक रुग्‍णा‍गणिक पीएच चे कारण शोधणे व रूग्‍णाच्‍या वैयक्तिक गरजेनुसार टेलर थेरपी चा अचूक उपयोग करणे खूप महत्‍वाचे आहे. अचूक उपचारपद्धती व टेलर-मेड मॅनेजमेंट योजना जर निश्चित करता आला तर पीएच आजार असलेले रूग्‍ण अनेक वर्षे सुखावह जीवन जगू शकतात.

मानवी हृदयाचे चार कप्‍पे असतात. वरच्‍या बाजूस दोन अलिंद (रिसीविंग चेम्बर्स ) आणि खालच्‍याबाजूस दोन निलय (पंपिंग चेम्बर्स ). ज्‍या रक्‍तवाहिन्‍या शरीराच्‍या इतर भागांकडून हृदयाकडे वापरलेल्‍या अशुद्ध रक्‍ताचा पुरवठा करतात त्‍यांना ‘‘शिरा’’ (वेईन्स) म्‍हणतात. तर ज्‍या रक्‍तवाहिन्‍या हृदयापासून दूर शरीराकडे ऑक्सिजन युक्‍त रक्‍ताचा पुरवठा करतात त्‍यांना ‘धमनी’(आर्टेरिस) म्‍हणतात. अशुद्ध रक्‍त (ऑक्सिजनचे अत्‍यल्‍प प्रमाण व कार्बनडायऑक्‍साइडचे अधिक प्रमाण) हे अनुक्रमे वरिष्‍ठ (सुपीरियर)आणि अध:स्‍थ (इन्फिरियर ) रक्‍तवाहिन्‍या (वेनकावा) मार्फत राइट एट्रियम (उजवे अलिंद) आणले जाते. हे रक्‍त नंतर उजव्‍या जवनिकेमार्फत (राईट साडेद वेंट्रीकल ) फुफ्फुसीय धमनीकडून डाव्‍या व उजव्‍या फुफ्फुसात पंप केले जाते. फुफ्फुसांमध्‍ये हे रक्‍त शुद्ध केले जाते. (ऑक्सिजन मिसळला जातो व कार्बनडायऑक्‍साइड बाजूला केला जातो) शुद्ध रक्‍ताचा पुरवठा नंतर डाव्‍या अलिंदाला (लेफ्ट साईडेड रिसीविंग चेंबर ) 4 फुफ्फुसीय शिरांकडून केला जातो. (उजव्‍या व डाव्‍या फुफ्फुसाकडील प्रत्‍येकी 2 शिरा) हे रक्‍त नंतर डाव्‍या जवनिकेव्‍दारे (लेफ्ट साडेद वेंट्रीकल) संपूर्ण शरीरभर मुख्‍य धमनी (मैन आर्टेरी )किंवा जिला महाधमनी (Aorta)असे म्‍हणतात. तिच्‍यामार्फत शरीरीच्‍या विविध अवयवांना ऑक्सिजनयुक्‍त रक्‍त पुरविले जाते.

हृदयाच्‍या डाव्‍या कप्‍प्‍यांमधील दाब हा उजव्‍या कप्‍प्‍यांमधील दाबाच्‍या तिप्‍पट असतो. राइट एट्रियम मधील दाब हा सामान्‍यपणे 3 mmHg (range 2-8 mmHg), राईट वेंट्रीकल – सिस्तोलिक प्रेशर 15-20 mmHg आणि डिऍस्टोलिक प्रेशर 0-8 mmHg असतो. मुख्‍य फुफ्फुसीय धमनीतील दाब 12-19 mmHg असतो. लेफ्ट ऍट्रिअल प्रेशर सामान्‍यपणे 8mmHg (6-12 mmHg) असते.

हृदयाची उजवी बाजू ही तुलनेने डाव्‍या बाजूपेक्षा कमकुवत असते. कारण या बाजूला फक्‍त फुफ्फुसांना रक्‍त पुरवठा करण्‍याचे कार्य असते.

फुफ्फुसीय रक्‍तवाहिन्‍यांमधील रक्‍तदाब वाढणे म्‍हणजेच फुफ्फुसीय उच्‍च रक्‍तदाब. पीएच हा अतिशय गुंतागुंतीचा आजार आहे ज्‍याबाबत वैद्यकिय व्‍यावसायिकांमध्‍ये आजाराचे नेमके निदान करण्‍याबाबत बरेच समज-गैरसमज आहेत. पल्मोनरी हायपरटेंशनची कारणे पाहता जागतिक आरोग्‍य संघटनेने (WHO)या आजाराचे पाच गटात विभाजन केले आहे.

या प्रकारच्‍या पीएच मध्‍ये फुफ्फुसीय धमनीतील दाब वाढतो त्‍यामुळे धमन्‍या अरूंद होतात व त्‍यांचा ताठरपणा वाढतो (फुफ्फुसीय धमनी कडक होते) त्‍यामुळे उजव्‍या रक्‍तवाहिनीला जाड आणि कडक झालेल्‍या फुफ्फुसीय धमनीला ओलांडून रक्‍त पुढे नेण्‍यासाठी त्रासदायक अथवा अडथळा येतो. हृदयाच्‍या उजव्‍या बाजूला असलेल्‍या या अतिरिक्‍त दाबामुळे हृदयाच्‍याआकारात वाढ होते आणि वेळीच लक्ष न दिल्‍यास हृदयाचा उजवी बाजू कमकुवत (फेल्योर ऑफ राईट हार्ट) होते. पीएएच ची विविध कारणे असू शकतात, जसे की जन्‍मजात हृदयरोग, यकृताचे आजार, एचआयव्‍ही (एड्स), मादक पदार्थांचे सेवन, वजन कमी करण्‍यासाठी वापरली जाणारी औषधे. पीएएच वरील उपचारांसाठी औषधे उपलब्‍ध असतानाही आजार पूर्णत: बरा होत नाही.

या प्रकारच्‍या पीएच मध्‍ये हृदयाच्‍या डाव्‍या बाजूकडील काही समस्‍या फुफ्फुसीय धमनीमधील दाब वाढण्‍यास कारणीभूत ठरतात. उदा. हृदयाच्‍या डाव्‍या निलयाच्‍या आकुंचन-प्रसरणातील अडथळा किंवा डाव्‍या बाजूच्‍या हृदयाच्‍या झडपांचे (Heart valves)आजार (mitral or aortic valve). या समस्‍यांमुळे फुफ्फुसातील शिरांमधील दाब अनियंत्रित होतो. या अनियंत्रित दाबाचा प्रभाव फुफ्फुसीय धमनीवर होतो, अर्थात फुफ्फुसीय धमनीवरील दाब वाढतो. पीएच हा प्रकार सामान्‍यत: अधिकांश रूग्‍णांमध्‍ये आढळून येतो. या गटातील रूग्‍णांना फुफ्फुसीय धमनीतील दाब कमी करणा-या औषधोपचारांपेक्षा हृदयाच्‍या डाव्‍या बाजूची कार्यक्षमता वाढवणा-या व दाब नियंत्रित करणा-या औषधोपचारांची आवश्‍यकता असते.

फुफ्फुसाचे जुनाट दीर्घकालीन आजार हे या प्रकारच्‍या पीएच चे एक कारण आहे. (CopDकिंवा एम्फिझिमा) श्‍वास घेण्‍यासाठी अडथळा किंवा उच्‍छ्वासावेळी येणारा अडथळा, झोपेतील श्‍वासावरोध तसेच समुद्रसपाटीपासून उंचावरील प्रदेशात दीर्घकाळ वास्‍तव्‍य हे गट – 3 पीएच :- असण्‍याची कारणे आहेत. वरील सर्व प्रकारच्‍या फुफ्फुसांच्‍या आजारामध्‍ये रक्‍तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते व कार्बनडायऑक्‍साइडचे प्रमाण वाढते. ज्‍यामुळे फुफ्फुसीय धमन्‍या अरूंद होतात परिणामी दाब वाढतो. या प्रकारच्‍या पीएच मध्‍ये रक्‍तवाहिन्‍यांचा आकार वाढवणारी औषधे फारशी परिणामकारक ठरत नाहीत. (Pulmonary vasodilator)

फुफ्फुसातील रक्‍तवाहिन्‍यांमध्‍ये दीर्घकाळापासून असलेल्‍या रक्‍ताच्‍या गुठळीमुळे फुफ्फुसातील धमनीतील दाब वाढतो. परिणामी CTEपीएच हा प्रकार दिसू लागतो. या प्रकारचा उच्‍च रक्‍तदाब आढळणारे रूग्‍ण फार कमी असतात, अर्थात या प्रकारच्‍या पीएच चे प्रमाण साधारणत: खूप कमी आढळते. (Pulmonary endortectomy)करून रक्‍ताच्‍या गुठळ्या काढून आजार बरा करता येतो. CTEपीएच प्रकारातील फुफ्फुसीय धमनीवरील दाब कमी करण्‍यासाठी वापरण्‍यात येणारी औषधे रूग्‍णाच्‍या बाबतीत प्रथम खालील बाब लक्षात घेवून देणे महत्‍वाचे आहे.

या गटात पीएच चे अचूक कारण समजून येत नाही. मात्र मूत्रपिंड निकामी होणे, सिकललेस आजार अर्थात रक्‍तातील लाल रक्‍तपेशींचा आजार, चयापचय प्रक्रियेतील बिघाड अशा कारणांचा यात समावेश होतो.

तात्‍पर्य

पल्‍मोनरी हायपरटेंशनच्‍या प्रकार कोणताही असो, प्रामुख्‍याने एक गोष्‍ट लक्षात ठेवावी, की हा एक गंभीर आजार आहे. पल्‍मोनरी वॅासेडिलेटर्समुळे या विकारावर नियंत्रण ठेवून रूग्‍णाचे जीवनमान निश्चितच सुधारता येते. तसेच गट-1 मधील पीएच चे प्रमाण या उपाययोजनांनी कमी करता येते.

तसेच गट-2 आणि गट-3 या पीएच च्‍या रूग्‍णांना पल्‍मोनरी वॅसोडिलेटर्सव्‍दारे उपचार करताना काही मर्यादा येतात. गट-4 मधील रूग्‍णांवर शस्‍त्रक्रिया आणि मर्यादित स्‍वरूपाचा पल्मोनरी वॅसोडिलेटर्सचा उपयोग करून नियंत्रण ठेवता येते. (वर नमूद केल्‍याप्रमाणे)

फुफ्फुसीय उच्‍च रक्‍तदाब हा एक दीर्घकालिक, अस्‍वस्‍थ करणारा, तीव्र निराशाजन्‍य आजार आहे. फुफ्फुसीय धमनीतील दाब वाढल्‍यामुळे हृदयाच्‍या पंपिंगचे कार्य जलदगतीने होते.

PH- ची सुरूवातीची संभाव्‍य लक्षणे:

इतर आजारांची आणि पीएच ही लक्षणे सामायिक असल्‍यामुळे पीएच चे निदान होण्‍यासाठी सरासरी 2 ते 3 वर्षे लागतात. हृदयाच्‍या उजव्‍या बाजूच्‍या कार्यक्षमतेत बिघाड झाल्‍यामुळे

हृदयामध्‍ये छिद्र असलेल्‍या रूग्‍णांमध्‍ये ओठ आणि बोटांचा निळसर रंग दिसून येतो. या व्‍यतिरिक्‍त ‘‘रेनॉडस फिनॉमिनन’’, चेह-यावरील पुरळ आणि प्रकाश संवेदनशीलता इ. लक्षणे दिसून येतात.

प्राथमिक व नियमित तपासणीमधून PHव्‍याधीचे निदान लागलीच होत नाही. प्राथमिक स्‍वरूपामध्‍ये डॉक्‍टरही याचे निदान करू शकत नाही. रूग्‍णाला PHअसण्‍याची शंका डॉक्‍टरांना आल्‍यास, विविध तपासण्‍या व त्‍याव्‍दारे आलेले निष्‍कर्ष (Results)यांतून सर्व शक्‍यता पडताळून पाहिल्‍या जातात व या आजाराचे निदान केले जाते. या आजाराचे एकदा निदान झाले की रूग्‍णाला इतर काही चाचण्‍या करून घेण्‍याचा सल्‍ला दिला जातो की ज्‍यामुळे PHनिदानाची कारणे व खात्री रूग्‍णाला देता येते. आजाराची कारणे सांगितली जातात.

पीएच – व्‍याधी किंवा आजाराचे निदान करण्‍यासाठी कराव्‍या लागणा-या तपासण्‍या / चाचणी

  • छातीचा एक्‍स-रे:छातीचा एक्‍स-रे ही पहिली तपासणी पायरी की तुम्‍हाला डॉक्‍टरांकडून सुचविली जाईल. हृदयाच्‍या उजव्‍या बाजूचा वाढलेला आकार किंवा फुफ्फुसीय धमनीचा वाढलेला आकार यांतून दिसून येतो.
  • इलेक्‍ट्रोकार्डिओग्राम (ECG): हृदयाची स्‍पंदने त्‍वरीत करणारी / मोजणारी ही चिकित्‍सा. यामुळे उजव्‍या अलिंद (कर्णिका)(Right atrium) आणि उजवी जवनिका (Right ventricle)याचा विस्‍तार दिसतो. तथापि ECG हा एकच घटक पीएच च्‍या निदानासाठी पूरक नसून इतर काही चाचण्‍या करणेही क्रमप्राप्‍त ठरते.
  • इकोकार्डिओग्राम (ECHO): अल्‍ट्रासाऊंड ऑफ हार्ट ही एक non invasive मात्र सुरक्षित चाचणी जी PHनिदानाची पुष्‍टी देते तसेच PHच्‍या अन्‍य कारणांवर प्रकाशझोत टाकते. एक अनुभवी तज्ञ डॉक्‍टर रूग्‍णाचे ECHO सुरू असताना फुफ्फुसीय धमनीतील दाबाचे तसेच उजव्‍या जवनिकेच्‍या (right ventricle)कार्यक्षमतेचे मुल्‍यांकन करू शकतो. या व्‍यतिरिक्‍त PH-Secondary ते हृदयाच्‍या डाव्‍या बाजूचे आजार (group 2पीएच)आणि जन्‍मजात हृदयरोग यांचे निदान इकोकार्डिओग्रामव्‍दारे केले जाते. रूग्‍णाला योग्‍य उपचार पद्धती मिळवून देण्‍यासाठी ECHO हे Monitoring Tool चे कार्य करते.
  • कार्डियाक कॅथेटरायझेशन विथ व्‍हसोडिलेटर स्‍टडी (None invasive): टेस्‍ट मधील प्रारंभीचे निष्‍कर्ष / निदान जर पीएच सूचित करत असतील तर पीएचच्‍या निदानार्थ तुमचे डॉक्‍टर वरील उपचार पद्धतीनुसार कार्डियाक कॅथेटरायझेशन देण्‍यासाठी आखणी करतील. ही एकमेव चाचणी आहे जी फुफ्फुसाच्‍या धमनीतील दाब अचूकपणे मोजू शकते, त्‍यामुळे पीएचचे अचून निदान होण्‍यासाठी बहुतांशी ही चाचणी करणे उपयुक्‍त ठरते.

या उपचारात रूग्‍णाच्‍या मांडीतून किंवा मानेतून एक कॅथेटर (मऊ रबर / प्‍लास्टिक ट्यूब) घातली जाते, त्‍याव्‍दारे फुफ्फुसीय धमनीचा दाब मोजला जातो. ही उपचारपद्धती पीएच च्‍या निदानासाठी “Gold Standard” अर्थात सर्वोत्‍तम आहे. एकदा का या उपचारपद्धतीव्‍दारे baseline pressure मोजले की डॉक्‍टर फुफ्फुसीय धमनी (lung artery) dilate (विस्‍तार) करण्‍यासाठी (nitric oxide, epoprostenol, iloprost)इ. औषधांचा उपयोग करतात व पुन्‍हा दाबाचे मापन करतात. याव्‍दारे फुफ्फुसीय धमनी किती काळाकरिता relax होऊ शकते हे निश्चित केले जाते. सदर चाचणी सकारात्‍मक आली तर (किंवा टेस्ट पॉसिटीव्ह असेल) कॅल्शियम चॅनेल ब्‍लॉकर्स जे तोंडावाटे देण्‍यात येणारे व भारतात कोठेही सहज उपलब्‍ध होणारे औषध दिले जाते. पॉसिटीव्ह वॅसोडिलेटर टेस्‍ट असल्‍यास रूग्‍णांना या पद्धतीने उपचार सुरू करणे प्राथमिक अवस्‍थेत पर्याप्‍त ठरते. (NICE 2018)च्‍या सद्य मार्गदर्शक तत्‍वांनी पीएच असलेल्‍या सर्व कॅथेटरायझेशन चाचणीची शिफारस केली आहे.

प्राथमिक स्‍वरूपातील पीएच निदानाच्‍या चाचण्‍या झाल्‍या की पीएचचे अचूक (निदान) कारण शोधणे पर्याप्‍त ठरते. त्‍याचसाठी आपल्‍या डॉक्‍टरांकडून आपल्याला वेगवेगळ्या टेस्ट करण्‍यासाठी सुचविले जाते. यामध्‍ये प्रामुख्‍याने पुढील टेस्‍ट करण्‍यास रूग्‍णाला सुचविले जाते. :

  • रक्‍तनिदान (Blood Test)चाचणी: काही रक्‍त चाचण्‍या उदा. arterialblood gas, complete Hemogram, HIV, Hepatitis B आणि C, ANA (टेस्ट to rule out collagen vascular disease) By Immunofluorescence assay, liver and kidney function test, thyroid function टेस्ट इ. चाचण्‍या पीएचचे अचूक कारण शोधण्‍यासाठी सुचविण्‍यात येतात.
  • पल्मोनरी कार्य टेस्ट डीएलसीओ सह:- Group 3-पीएच असलेल्‍या रूग्‍णांसाठी ही चाचणी सुचवण्‍यात येते. याव्‍दारे आपल्‍या फुफ्फुसांची हवा धारण करण्‍याची क्षमता तसेच फुफ्फुसांनी धारण केलेल्‍या हवेची आत-बाहेर होणारी हालचाल व फुफ्फुसाची ऑक्सिजन आणि कार्बनडायऑक्‍साईड अदलाबदल करण्‍याची क्षमता इ. चे परीक्षण केले जाते.
  • सीटी पुल्मोनरी एंजिओग्राम: फुफ्फुसीय रक्‍तवाहिन्‍यांमधील रक्‍ताच्‍या गुठळ्या (Gr 4 -पीएच)चे निदान करण्‍यासाठी उपयुक्‍त चाचणी. तसेच या चाचणीने (Gr 3 -पीएच) चे कारण असलेल्‍या फुफ्फुसांच्या आजाराचे निदान करता येते.
  • पोर्टल वेनस डॉप्लर सहित पेटाची अल्ट्रासाउंड: पीएच ची इतर काही कारणे उदा. यकृताचे आजार किंवा abdomen आणि blood vessels मधील संतुलन बिघाड इ. कारणांचे निदान करण्‍यासाठी उपयुक्‍त चाचणी.
  • न्यूक्लियर स्कॅन / VQ स्कॅन : सीटी पुल्मोनरी एंजिओग्राम टेस्‍टझाल्‍यानंतर (कदाचीत) क्‍वचीत फुफ्फुसीय रक्‍तवाहिन्‍यांमधील रक्‍ताच्‍या गुठळ्यांचे निदान न झाल्‍यास अथवा निदर्शनास न आल्‍यास न्‍युक्लिअर स्‍कॅन / VQ scan ने पुन्‍हा फुफ्फुसीय रक्‍तवाहिन्‍यांमधील रक्‍ताच्‍या गुठळ्यांचे निदान करण्यासाठी ही चाचणी उपयुक्‍त ठरते.
  • स्लीप स्टडी: काही पेशंट्सच्‍या बाबतीत अतिलठ्ठपणामुळे श्‍वास घेण्‍यात क्षणात येणारा अडथळा आणि ऑक्सिजनची पातळी कमी होणे यासाठी ही चाचणी उपयुक्‍त ठरते.
  • जेनेरिक टेस्ट: इतर सर्व चाचण्‍यांतून अपेक्षित Result / निष्‍कर्ष काढता न आल्‍यास पीएच चे अनुवंशिक कारण आहे का हे पाहण्‍यासाठी Genetic टेस्ट करण्‍याचा सल्‍ला डॉक्‍टर देतात.

वरील चाचण्‍या किंवा इतर काही चाचण्‍यांवरूनही रूग्‍णामधील पीएच चे कारण निश्चित होऊ शकत नाही. अशावेळी रूग्‍णामधील या आजाराचे निदान “इडियोपॅथिक पल्मोनरी हाइपरटेंशन” असे केले जाते.

पीएच आणि त्‍याची कारणे यांचे निदान झाल्‍यावर पीएच असलेल्‍या रूग्‍णांनी तज्ञ डॉक्‍टरांकडे नियमित तपासणीस जाणे आवश्‍यक आहे.तज्ञ डॉक्‍टर रूग्‍णांना प्रत्‍येक 3 ते 6 महिन्‍यांनी फॉलो अप करण्‍याची शिफारस देतात. पीएच च्‍या प्राथमिक निष्कर्षानुसार फॉलो अप च्‍या वेळेस रूग्‍णांना औषधोपचारातील काही बदल सुचविण्‍यासाठी आणि पीएच ची इतर कारणे जी रूग्‍णाला त्रासदायक आहेत, त्‍यांचे क्लिनिकल trialsकरण्‍यासाठी खालील चाचण्‍या सुचविल्‍या जातात.

  • क्लिनिकल असेसमेंट: प्रत्‍येक भेट च्‍या वेळी क्लिनिकल असेसमेंट होणे महत्‍वाचे ठरते. यामध्‍ये रूग्‍णाची कार्यक्षमता व हृदयाच्‍या उजव्‍या बाजूमधील काही बिघाड असल्‍याची शक्‍यता आहे का / तशी लक्षणे दिसतात का ? याचे निरीक्षण केले जाते.
  • इकोकार्डिओग्राम: पप्रत्येक पाठपुरावा च्‍या वेळी इकोकार्डिओग्राम चे तपशील महत्‍वाचे असतात. हृदयाच्‍या उजव्‍या बाजूची कार्यक्षमता पाहण्‍यासाठी इकोकार्डिओग्राम आवश्‍यक आहे. फुफ्फुसीय धमनीच्‍या दाब वेळोवेळी बदलत असल्‍याने PA चे व त्‍यावरील दाबाचे मुल्‍यांकन करण्‍यासाठी इकोकार्डिओग्राम हा एक मार्ग आहे.
  • Exercise टेस्ट: भेट दरम्‍यान साधारणत: 6 मिनीटे चालण्‍याची टेस्ट घेतली जाते. एका मिनीटात रूग्‍णाने चाललेले अंतर पाहून त्‍यावरून पेशंटची चालण्‍याची क्षमता तपासली जाते व त्‍यानुसार Exercise दिले जातात.
  • Blood टेस्ट: NT pro, BNP or BNP टेस्ट या विशेष रक्‍तचाचण्‍या 6 महिन्‍यातून एकदा करून घेण्‍यास सांगितल्‍या जातात. हृदयाच्‍या उजव्‍या बाजूच्‍या कार्यक्षमतेबाबतची माहिती या टेस्‍टमधून मिळते.

प्रत्‍येक भेटच्‍या वेळी रूग्‍ण सुचविलेल्‍या औषधोपचारांना कसा प्रतिसाद देतात हे पाहणे आवश्‍यकता ठरते. त्‍यानुसार रोगाचे लवकर निदान होणे व अचूक औषधोपचार रूग्‍णाला सुरू करणे महत्‍वाचे आहे.

फुफ्फुसीय उच्‍च रक्‍तदाब हा दीर्घकालिक, निराशाजनक, त्‍वरीत बरा न होणारा आजार आहे. लवकर निदान, नियमित follow up, रूग्‍णकेंद्रीत उपचारपध्‍दती ही उपचारांची गुरूकिल्‍ली आहे. सध्‍याच्‍याऔषधोपचारांपूर्वी – पीएच चे पूर्वानुमान करणे केवळ 10% रूग्‍णांच्‍या बाबतीत 10 वर्षे जीवनमान एवढेच असे. मात्र पीएच वरील सध्‍या देण्‍यात येणा-या औषधोपचारांमुळे रूग्‍णांचे बरे होण्‍याचे प्रमाण 80 ते 90% इतके लक्षणीयरित्‍या वाढले आहे. पण संपूर्ण जगाच्‍या इतर काही देशांमध्‍ये बहुतेक औषधे विशेषत: प्रोस्टासीक्लिन अ‍ॅनालॉग्स हे सध्‍या तरी भारतीय बाजारपेठेत उपलब्‍ध नाही. अनेकदा एखाद्या रूग्‍णासाठी ते आयात करणे हे काही मोजक्‍या वैद्यकीय संस्‍थांनाच शक्‍य झाले आहे.

जेव्‍हा एखाद्या रूग्‍णाच्‍या बाबतीत पीएच चे निदान होते तेव्‍हा संभाव्‍य धोक्‍यांचे स्‍तरीकरण करणे आवश्‍यक असते. त्‍याच्‍या / तिच्‍या क्लिनिकल टेस्ट आणि विविध lab टेस्ट नुसार उच्‍च, मध्‍यम किंवा कमी धोकादायक असे रूग्‍णांचे वर्गीकरण केले जाते. पल्मोनरी हाइपरटेंशन च्‍या उपचारपध्‍दतीचे मूळ उद्देश म्‍हणजे रूग्‍णाला शक्‍य तितक्‍या लवकर कमी धोकादायक श्रेणीमध्‍ये आणणे व अधिक काळासाठी त्‍याला या श्रेणीमध्‍यचे कसे ठेवता येईल यासाठी प्रयत्‍न करणे.

एक वर्षाच्‍या कालावधीसाठी पीएच च्‍या रूग्‍णाच्‍या औषधोपचार मिळणे व त्‍याच्‍या धोकादायकतेचे मूल्‍यमापन करण्‍याच्‍यादृष्‍टीने विविध online tools उपलब्‍ध आहेत. The reveal calculator हे online tools पैकी असेच एक साधन जे पीएच रूग्‍णामधील एक वर्षाच्‍या कालावधीकरिता मुल्‍यांकन करू शकते.
https://www.mdcalc.com/reveal-registry-risk-score-पल्मोनरी-arterial-हाइपरटेंशन-pah#use-cases

एखाद्या रूग्‍णामध्‍ये पीएच चे निदान झाल्‍यानंतर, उपचार योजना तयार करून त्‍याप्रमाणे त्‍याचे अनुकरण करणे आवश्‍श्‍यक आहे. पीएच हा एक गुंतागुंतीचा आजार आहे की ज्‍याचा उपचार वेगवेगळ्या कारणमिमांसा (etiologist) वर आधारीत आहे. रूग्‍णागणिक उपचार पद्धती बदलते. पीएचआणि PAHया दोन्‍ही वेगळ्या व्‍याधी आहेत यातील फरक समजून घेणे महत्‍वाचे आहे. सध्‍या उपलब्‍ध असलेली औषधे ही PAH च्‍या रूग्‍णांसाठी उपयुक्‍त आहेत, आणि कदाचित पीएचच्‍या इतर गटातील रूग्‍णांसाठी ती खूप फायदेशीर नाहीत किंवा हानीकारक नाहीत. त्‍यामुळे पीएच तज्ञांना हे निश्चित करणे आवश्‍यक आहे की रूग्‍णाला पीएच आहे की PAH आहे.

एखादा अनुभवी, तज्ञ पीएच विशेतज्ञ त्‍यांच्‍याकडे आलेला रूग्‍ण कोणत्‍या पीएचगटातला आहे हे निश्चित करेलही मात्र PAH आणि पीएच चे इतर प्रकार यांच्‍यातला फरक जाणून घेण्‍याचा खात्रीशीर मार्ग म्‍हणजे रूग्‍णाचे राईट हार्ट कॅथेटराईझेशन करणे.

येथे आपण Gr.1 पल्मोनरी हायपरटेंशनसाठी उपचार पर्यायांवर चर्चा करू:- PAH जरी असाध्‍य असला तरी a tailor made management plan मुळे यावर नियंत्रण करणे सुलभ होते व त्‍यामुळे रूग्‍णाचे जीवनमान सुधारते. उपचार पद्धतींमध्‍ये पारंपारिक वैद्यकीय उपचार, पल्मोनरी वॅसोडिलेटरआणि शेवटी शस्‍त्रक्रिया व cardiac cath procedure इ. चा समावेश आहे. जरी prostanoids(पीएच वरील मुख्‍य औषधोपचार) भारतात उपलब्‍ध नसले तरी एखाद्या रूग्‍णासाठी ते आयात केले जावू शकते.

कॉन्वेशनल मेडिकल थेरपीस :- यामध्‍ये खालील बाबींचा समावेश होतो:

या गोष्‍टींबद्दल तपशीलवार पुढे चर्चा करू.

Specific Pulmonary वेसोडीलेटर मध्‍ये पुढील गोष्‍टींचा समावेश होतो:

कोणती औषधे या उपाय योजनेअंतर्गत येतात ? त्‍यापैकी भारतात कोणती औषधे उपलब्‍ध आहेत ?
Sildenafil आणि Tadalafilयासारखी औषधे उपलब्‍ध असून ती भारतात सहज उपलब्‍ध आहेत. Generic firmsमध्‍येही उपलब्‍ध आहेत.

या औषधांचा परिणाम कसा होतो ?
Phosphodiesteraseहे एक enzyme (शरीरात निर्माण होणारे द्रव्‍य) जे फुफ्फुस व पुरूषांच्‍या जननेंद्रियाच्‍या रक्‍तवाहिन्‍यांतर्गत आढळून येते. हे enzyme – endogenous nitric oxideचा –हास रोखते. यामुळे नायट्रीक ऑक्‍साइडची शरीरातील पातळी वाढते. त्‍यामुळे नायट्रीक ऑक्‍साइड उत्‍तेजित होते आणि enzyme gunaylate – cyclic GMP करण्‍यासाठी प्रभावित होते. Cyclic GMP रक्‍तवाहिन्‍या शिथिल करते. त्‍यामुळे दाब कमी होतो व रक्‍तवाहिन्‍यातून अधिक रक्‍त वाहू लागते.

संपूर्ण प्रक्रिया किती वेळ कार्यरत राहते ? रूग्‍णावर संपूर्ण प्रक्रियेचा प्रभाव किती ?
पीएच हा एक आक्रमक आजार असल्‍याने औषधे घेतल्‍यानंतही रूग्‍णाची लक्षणे वाढू शकतात.

औषधाचे दुष्परिणाम कोणते ?
बहुधा आढळून येणारे दुष्‍परिणाम म्‍हणजे नाकातून होणारा रक्‍तस्‍त्राव, नाक चोंदणे, डोकेदुखी, छातीत जवळजळ, flushing, जबडा दुखणे, पाय दुखणे, अतिसार आणि मळमळयापैकी बहुतेक तात्‍पुरत्‍यास्‍वरूपाचे दुष्‍पपरिणाम आहेतकी जे 1 ते 2 आठवडे राहतात आणि बहुतांशी रूग्‍ण हे दुष्‍परिणाम सहन करू शकतात. Sildenafil आणि Tadalafilच्‍या सेवनाने दृष्‍टी अंधुकपणा व अंधत्‍व आल्‍याची काही दुर्मिळ उदाहरणे आहेत.
Non-atretic anterior ishemic optic neuropathy अर्थात NAION हा फार दुर्मिळ दिसून येणारा Secondary side effect.
\तथापि मधुमेह, उच्‍च रक्‍तदाब आणि कोलेस्‍टेरॉल असलेल्‍या पुरूष रूग्‍णांमध्‍ये NAION चे प्रमाण जास्‍त आहे. म्‍हणून sildenafil किंवा tadalfil घेणा-या रूग्‍णांमध्‍ये NAION चे लक्षण हे प्रमाण सर्वसामान्‍यांमध्‍ये खूप जास्‍त आढळून येत नाही / किंवा लक्षणीय नाही (संदर्भ) –कृपया वरीलपैकी लक्षणे अथवा दुष्परिणाम दिसून आल्‍यास आपल्‍या पीएच विशेषज्ञांशी त्‍वरीत संपर्क साधावा, सल्‍ला घ्‍यावा.

मी कोणती खबरदारी घ्‍यावी?
ही औषधे परस्‍पर प्रक्रिया करत असल्‍याने (Isosorbide, Imdur, Ismoइ.) या औषधांसोबत त्‍यांचा उपयोग करू नये. जर तुम्‍ही यापैकी कोणतेही औषध घेत असाल तर आपल्‍या डॉक्‍टरांना तशी पूर्वकल्‍पना द्या. जर तुमच्‍या छातीत दुखत असेल आणि त्‍यासाठी तुम्‍ही कोणत्‍याही रूग्‍णालयाच्‍याआपत्‍कालीन विभागात जाल तेव्‍हा डॉक्‍टरांना दुम्‍ही sildenafil / tadalfilघेत असल्‍याची माहिती द्या.
“छातीत दुखणे” यावर Nitratesहे सर्वसाधारण औषध रूग्‍णाला बहुतांशी दिले जाते.

Sildenafil सुरू असताना ते बदलून मी Tadalfilघेवू शकतो का ?
खरतर नाही. tadafilमध्‍ये sildenafil पेक्षा अधिक परिणामकारकता आढळते. दिवसातून एकदाtadafilघेता येवू शकते.Sildenafil मात्र दिवसातून 3-4 वेळा घ्‍यावी लागते.

अंदाजे खर्च / महिना?
भारतातील विविध कंपन्‍या Sildenafil आणि Tadalfilचे उत्‍पादन करतात. Generic firms मध्‍येही ही औषधे उपलब्‍ध आहेत. त्‍यामुळे किंमत वेगवेगळी असू शकते. तथापि डॉक्‍टरांनी औषधाची योग्‍य मात्रा (doses)सुचविली तर अंदाजे 1800-2400 रू. प्रति महिना खर्च येतो.

कोणती औषधे या श्रेणीत (वर्गात) येतात ? भारतात या श्रेणीतील कोणती औषधे उपलब्‍ध आहेत ?
Bosentan, Ambresentanआणि Macitentanयासारखी औषधे यात समाविष्‍ट आहेत. वरील तिन्‍ही औषधे भारतात उपलब्‍ध आहेत.

त्‍यांचा परिणाम कसा होतो / कार्य कोणते ?
Endothelis (ET) हे पेप्‍टाइड्स असतात जे सामान्‍यत: शरीरात असतात. त्‍यांच्‍या संपर्कात जेव्‍हा ET येते तेव्‍हा ते दाब वाढण्‍यास प्रतिबंध करते. शरीराची सुरक्षित यंत्रणा ET व्‍दारे केली जाते. PAH असणा-या रूग्‍णांमध्‍ये endothelisची वाढलेली (संख्‍या) मात्रा त्‍यांच्‍या receptors (lung vessels वर) सह प्रभाव पाडते. त्‍यामुळे फुफ्फुसामधील रक्‍तदाब वाढतो. ERA antagonist मुळे ET (receptors binding) पासून सुरक्षित राहते. त्‍याचवेळी रक्‍तवाहिन्‍या विस्‍फारतात आणि त्‍याची वाढ व त्‍यातील prdiferationयांचा वेग मंदावतो. हे औषधोपचार घेणारे पेशंट त्‍यांच्‍यामध्‍ये त्‍वरीत सुधारणा दिसून येत नाही. या औषधाचे फायदे समजून घेण्‍यासाठी किमान एक महिना किंवा अधिक कालावधी लागतो.

दुष्‍परिणाम कोणते ?
ERA प्रामुख्‍याने फायदेशीर आहे. सर्वसामान्‍य दुष्‍परिणाम म्‍हणजे liver toxicity – यकृताचा विषाक्‍तपणा (Bosentan), पायावरील सूज (Ambresentanआणि Bosentan)आणि अॅनिमिया (Macitentan).जे रूण यकृताचा विषाक्‍तपणा (Bosentan) अनुभवतात त्‍यांच्‍यासाठी महिन्‍यातून एकदा Liver function टेस्ट करण्‍याचा सल्‍ला दिला जातो. यकृत कार्यातील बिघाड हा हृदयाच्‍या उजव्‍या बाजूतील बिघाडामुळे असू शकतो. त्‍यामुळे तुमच्‍यावर उपचार करणा-या पीएच विशेषज्ञासमवेत पीएच चे कारण कोणते व त्‍याचे निराकरण कसे करावे हे समजून घेणे महत्‍वाचे आहे. यकृताच्‍या कार्यामध्‍ये लक्षणीय बिघाड झाल्‍यास Bosentorथांबवून त्‍याच वर्गातील / समुहातील (Ambresentanकिंवा Macitentan) औषधे सुरू करावी लागतील.

मी आधीच ERA वर असेल तर दुस-या पद्धतीचा स्‍वीकार करू शकतो का ?
जर वर नमूद केल्‍याप्रमाणे तुमच्‍यामध्‍ये दुष्‍परिणाम (side effect)दिसून आले तर कदाचित तुमचे डॉक्‍टर तुम्‍हाला Bosentanन देता (वरून) Ambresentanकिंवा Macitentanदेऊ शकतात. परंतु जर एखादा रूग्‍ण एखादे औषधास उत्‍तम प्रतिसाद देत असेल तर औषधे बदलणे फायदेशीर ठरत नाही.

अंदाजे प्रति महिना खर्च किती ?
योग्य प्रमाणात ठरवून दिलेल्‍या औषधांचा अंदाजे खर्च महिन्‍यास साधारणत: रू. 4500/- ते 6000/- इतका आहे.

प्रोस्‍टॅनॉईड्स अशा प्रकारचे मानव निर्मित पदार्थ जे आपल्‍या शरीरात नैसर्गिकरित्‍या आढळते (prostacyclin 122) प्रोस्‍टॅसायक्‍लीन, रक्‍तवाहिन्‍यांचा विस्‍तार करते, प्‍लेटलेट्सचे एकत्र येणे (clump) थांबवते, हृदयाची कार्यक्षमता वाढवतेआणि रक्‍तवाहिन्‍यांमधील स्‍नायुंची वाढ कमी करते. PAH असणारे व इतर रूग्‍ण prostanoidsला उत्‍तम प्रतिसाद देतात तसेच prostanoidsमुळे काहींची जीवनशैलीही सुधारलेली आढळते.

Prostanoidsऔषध समुहात कोणती औषधे समाविष्‍ट आहेत?त्‍यापैकी भारतात कोणती औषधे उपलब्‍ध आहेत ?
PAH असलेल्‍या रूग्‍णांचा मृत्‍यूदर कमी करणारी prostanoidsही पहिली औषधे होत. Epoprostenolहे पहिले औषध जे PAH साठी US FDA ने मंजूर केले होते. शिरेव्‍दारे, त्‍वचेखालून, श्‍वासोच्‍छवासाव्‍दारे किंवा तोंडावाटे देण्‍यासाठी प्रोस्‍टेनॉईड्सचा उपयोग केला जावू शकतो.
प्रोस्‍टेनॉईड्सची पुढील काही सर्वत्र उपलब्‍ध असणारी उदाहणे:

  • इंजेक्‍शन स्‍वरूपात:
    • Intravenous – शिरेव्‍दारे – Epoprstenolol, Trepostinil
    • Subcutaneous – त्‍वचेखालून देण्‍यात येणारे – continuous infusion – trepostinil
  • Inhaled form – nebulizer म्‍हणून –Iloprost, Trepostinil
  • Oral – Beraprost.

वरील औषधांव्‍यतिरिक्‍त अलीकडे प्रोस्‍टासायक्लिन रिसेप्‍टरला उत्‍तेजन देणारे औषध तोंडाव्‍दारे घेण्‍यासाठी उपलब्‍ध आहे. (Selexipag) दुदैवाने भारतात कुठल्‍याही prostanoidsचे उत्‍पादन होत नाही. त्‍यामुळे एखाद्या रूग्‍णासाठी ते वैयक्तिकपणे आयात केले जावू शकते. भारतात prostanoidsच्‍या वापराबाबत अनेक मर्यादा येतात. उपलब्‍धतेसह इतर महत्‍वाची मर्यादा म्‍हणजे Continues IV / subcutaneous line. संपूर्ण नैदानिक परिस्थितीचा विचार करता, माझे वैयक्तिक मत आहे की iloprost हे भारतात PAH संदर्भात सर्वात व्‍यवहार्य, परवडणारे व प्रभावी औषध आहे. सध्‍या आमच्‍याकडे 13 रूग्‍ण आहेत जे प्रोस्‍टॅनॉइड्स घेत आहेत (12-iloprost)घेणारे व 1-subcutaneous trepostinilघेणारा) PAH पासून आराम मिळवण्‍यासाठी वरील औषधोपचार घेणा-या सर्व रूग्‍णांमध्‍ये लक्षणीय सुधारणा झाल्‍याचे आढळून येते. Inhaled Prostacyclin साठी अंदाजे खर्च सद्यपरिस्थितीत प्रति महिना रू. 20,000/- इतका आहे.

या औषधांचा प्रभाव किती काळ राहू शकतो ? वेदना किती काळ सहन करू शकतो ?
हProstanoidsकाही वेळा रूग्‍णांची सहनशीलता वाढवण्‍यास मदत करते. मात्र अनेकदा prostanoidsप्रमाणात वाढ करावी लागते, आवश्‍यकता भासते. Potts shunt किंवा Lung transplant साठी इतर उपचार पद्धतीचा विचार करणे आवश्‍यक असते.

दुष्‍परिणाम कोणते ?
सर्वसामान्‍य दुष्‍परिणाम जसे – नाक चोंदणे, जबड्यातील वेदना, डोकेदुखी, फ्लशिंग (अंग तापल्‍यासारखे वाटणे / अंगातून गरम वाफा येत आहेत असे वाटणे), अतिसार, मळमळ आणि उलट्या इ. (समावेश आहे) दुष्‍परिणाम आढळून येतात. यातील बरेचसे दुष्‍परिणाम तात्‍पुरत्‍या स्‍वरूपाचे असतात, रूग्‍णांच्‍या नियमित औषध सेवनाने ते थांबतात.

अंदाजे प्रति / महिना खर्च ?
भारतामध्‍ये iloprostप्राप्‍त होणे आणि ते वापरताना होणारा अंदाजे प्रति महिना खर्च रू. 20000/- इतका आहे. अधिकाधिक रूग्‍णांनी हे औषध वापरण्‍यास सुरूवात केल्‍याने यात लक्षणीय घट झालेली दिसून येते.

या औषध समुहांमध्‍ये येणारी औषधे कोणती व त्‍यापैकी कोणती औषधे भारतात उपलब्‍ध आहेत ?
Riociguatहे औषध या समूहामध्‍ये समाविष्‍ट होते.PDE5 inhibitors (sildenafilआणि tadalfil) म्‍हणजेच हे औषध कार्य करते. मात्र PDE5 inhibitors की जे नायट्रीक ऑक्‍साइडचे degradation करते त्‍याचा अपरोक्ष Riociguat nitric oxide receptor ला direct stimulate करते. सध्‍या Riociguatभारतात उपलब्‍ध आहे.

या औषधाचे दुष्‍परिणाम कोणते ?
PAH (च्‍या) वरील इतर औषधांप्रमाणेच याचे दुष्‍परिणाम आढळून येतात. शरीरीचा दाब कमी करतात (lower the pressure of body)ज्‍यामुळे चक्‍कर येवू शकते, त्‍यामुळे योग्‍य वैद्यकीय मार्गदर्शन घेवूनच याचा उपयोग करणे महत्‍वाचे ठरते. तसेच रूग्‍णाला जर sildenafil किंवा tadalfilसुरू असेल तर Riociguatसुरू करण्यापूर्वी 48-72 तास सदर औषधे त्‍वरीत थांबवावी.

  • Calcium Channel Blockers ही औषधे आहेत, ती फक्‍त अशा रूग्‍णांमध्‍ये वापरली जाऊ शकतात ज्‍यांना राईट हार्ट कॅथेटराईझेशन पॉसिटीव्ह वेसोडीलेटर उपचार पद्धती सुचवली आहे / सुरू आहे. (Section – राईट हार्ट कॅथेटराईझेशन – माहिती पहा)
  • फुफ्फुसांना रक्‍त पुरवठा करणा-या रक्‍तवाहिन्‍यांमधील smooth muscle ना शिथिल करण्‍याचे कार्य CCBकरते. CCB चा प्रभाव रूग्‍णावर त्‍वरीत पडतो व फार कमी कालावधीत रूग्‍णाला बरे वाटते.
  • CCB – भारतात सहज उपलब्‍ध आहे व इतर पीएच औषधांपेक्षा तुलनेने ते स्‍वस्‍त आहे. म्‍हणूनच रूग्‍णाला CCB सुरू करणे हे उचित / योग्‍य आहे की नाही हे ठरवण्‍यासाठी वेसोडीलेटर अभ्‍यासासह राईट हार्ट कॅथेटराईझेशन करणे आवश्‍यक व महत्‍वाचे आहे.

राईट हार्ट कॅथेटराईझेशन शिवाय CCB चा उपयोग केला जाऊ शकतो का ?
नाही - / पीएच च्‍या रूग्‍णांमध्‍ये कधीही राईट हार्ट कॅथेटराईझेशन शिवाय CCB चा उपयोग करू नये. वेसोडीलेटर साठी रूग्‍ण जेव्‍हा (पॉसिटीव्ह ) सकारात्‍मक प्रतिसाद देत नाहीत तेव्‍हा CCB हानीकारक होऊ शकते

CCB चा उपचार किती काळापर्यंत केला जाऊ शकतो ?
काही रूग्‍णांमध्‍ये CCB साठी ठराविक काळात resistance येऊ शकतो. मात्र रूग्‍ण हा त्रास सहन करू शकत असतील तर पीएच विशेतज्ञ कदाचित CCB पेक्षा Conventional pulmonary वेसोडीलेटर औषधोपचार सुचवू शकतात.

एट्रियल सेप्टोस्टॉमीः

हृदयाच्या वरच्या भाग यांना विभक्त करणार्‍या वरच्या भिंतीवर छिद्र बनवण्यास एट्रियल सेपटेक्टॉमी म्हणतात. हे ह्रदयाचा कॅथेटरिझेशन प्रक्रियेदरम्यान केले जाऊ शकते जेव्हा बलूनचा वापर करुन छिद्रांचा आकार क्रमिकपणे वाढविला जाऊ शकतो.

पॉट्स शंट:

पॉट्स शंट म्हणजे काय?
डाव्या फुफ्फुसातील रक्तपुरवठा धमनी आणि शरीराच्या खालच्या भागात रक्त पुरवठा करणार्‍या धमनी यांच्यात संप्रेषण तयार होणे याला पॉट्स शंट असे म्हणतात. फुफ्फुसीय धमनीमध्ये मर्यादित प्रवाह असलेल्या रुग्णांसाठी हे सुरुवातीला केले गेले. पीएएच मधील पॉट्स शंटचा नवीन वापर प्रथम बार्टू एट अलने वर्णन केला आहे.

पॉट शंट पीएएचला कशी मदत करते?
पॉट्स शंटमध्ये फुफ्फुसातील धमनी आणि शरीराच्या धमनी दरम्यान एक मोठा संप्रेषण आहे. पॉट शंट ज्या रूग्णांमध्ये फुफ्फुसीय धमनीचा दबाव शरीराच्या धमनी (सप्रॅसिस्टीमिक पल्मोनरी आर्टरी प्रेशर) पेक्षा जास्त असतो अशा शरीराची कमतरता शरीराच्या धमनीच्या भागात विघटन करून रुग्णांना मदत करू शकते. असे करून. हे शेवटी हृदयावरील दबाव कमी करते आणि त्याचे कार्य सुधारते.

पॉट्स शंट कधी केली जाते?
जास्तीत जास्त वैद्यकीय थेरपी घेतलेल्या पीएएचच्या रूग्णांवर क्लिनिकल, बायोकेमिकल किंवा इकोकार्डिओग्राफिक बिघाड झाल्याच्या अगदी प्राथमिक चिन्हावर पॉट्स शंट करणे अत्यंत महत्वाचे आहे. इष्टतम निकालांसाठी हे योग्य हृदयात अपरिवर्तनीय नुकसान होण्यापूर्वी केले जाणे आवश्यक आहे.

पॉट्स शंट कुठे केले जाऊ शकतात?
भारतातील फारच कमी केंद्रे पीएएच असलेल्या बिघडलेल्या रूग्णांमध्ये पॉट्स कमी करतात. कोकिलाबेन धीरूबाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई हे भारतातील आणि बहुतेक जगातील सर्वात अनुभवी केंद्र आहे.

पपॉट्स शंट संबंधित कोणते धोके आहेत?
पीएएच प्रमाणे पॉटची शंट ही रुग्णाची उच्च जोखीम प्रक्रिया असते. त्वरित यश प्रमाण 75-90% दरम्यान आहे. तथापि हे आमच्या केंद्रात तसेच पाश्चात्य जगामध्ये देखील आढळून आले आहे की जे शस्त्रक्रिया करून टिकून राहतात ते रुग्ण दीर्घकालीन तुलनेने चांगले करतात. या रुग्णांमध्ये पीएएचची विशिष्ट औषधी कमी करणे देखील शक्य आहे.

पॉटिंग शंटची अंदाजे किंमत किती आहे?
शस्त्रक्रिया आणि पोस्ट-ऑपरेटिव्ह व्यवस्थापनाची एकूण किंमत 3.5. 3.5 लाख इतकी आहे. तथापि, जोखीम आणखी कमी करण्यासाठी, पॉट्स शंटिंग टीम शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाला प्रॉस्टायक्लिन एनालॉग खरेदी करण्याची विनंती करू शकते. प्रॅस्टोनॉइड थेरपीच्या भागामध्ये ज्या किंमतीचा उल्लेख केला आहे.

फुफ्फुसांचे प्रत्यारोपण (फुफ्फुसांचे प्रत्यारोपण)

प्रत्यारोपण हा एक रुग्ण आहे ज्यांनी वरील सर्व उपचार पीएच साठी संपवले आहेत आणि अद्याप लक्षणे दर्शवित आहेत. मानवांमध्ये प्रथम यशस्वी फुफ्फुस प्रत्यारोपण 1973 मध्ये जोएल कूपरने केले. 1999 मध्ये ऑल इंडिया मेडिकल सायन्सेस येथे डॉ. पी. वेणुगोपाल यांनी भारतात प्रथम यशस्वी हृदय प्रत्यारोपण केले आणि प्रथम हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण डॉ. केएम चेरियन यांनी केले. १९९९ में मध्ये मद्रास मेडिकल मिशन हॉस्पिटल. फुफ्फुस प्रत्यारोपणाचे यशस्वी कार्यक्रम देणारी फारच कमी रुग्णालये आहेत, त्यापैकी बहुतेक सर्व केंद्रीत दक्षिणेत, विशेषतः चेन्नईमध्ये आहेत.

जर फुफ्फुस प्रत्यारोपण हे शेवटचे ऑपरेशन असेल तर जरी बरेच वर्षांत बरीच प्रगती झाली आहे, तरीही फुफ्फुसांचे प्रत्यारोपण अद्याप एक अतिशय आव्हानात्मक प्रक्रिया आहे आणि यकृत, मूत्रपिंड किंवा हृदय प्रत्यारोपणाइतकी यशस्वी नाही. प्रत्यारोपणाच्या कोणत्याही रूग्णाला प्रतिकारशक्ती कमी करण्यासाठी औषधे (संक्रमणाशी लढण्याचे सामर्थ्य) घ्यावे लागतात. हे आवश्यक आहे जेणेकरून शरीराद्वारे नवीन अंग स्वीकारले जाईल. फुफ्फुस हा एकमेव अवयव आहे जो वायुसाठी खुला आहे आणि प्रत्येक श्वासोच्छवासासह विविध रोगकारक (बॅक्टेरिया, विषाणू, बुरशी इ.) च्या संपर्कात आहे. हे रोगप्रतिकारक प्रतिकारशक्तीची प्रवृत्ती निर्माण करण्याव्यतिरिक्त औषधे कमी करण्याचा उद्देश आहे.

प्रत्यारोपणासाठी योग्य वेळ कोणता आहे?
प्रत्यारोपणाच्या खाली असलेल्या एखाद्या रुग्णाच्या आधी खालील प्रश्न विचारले पाहिजेत:

पप्रत्यारोपणासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत?

अंदाजे प्रत्यारोपणाची किंमत किती आहे?
भारतात डबल फुफ्फुस आणि हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपणाची एक वेळची किंमत सुमारे 35 लाख रुपये आहे. पहिल्या वर्षात औषधांची किंमत सुमारे 10-12 लाख रुपये असते आणि त्यानंतर आजीवन दर वर्षी 90,000-1,00,000 रुपये असतात.

भारत वि पाश्चात्य जगामध्ये फुफ्फुस प्रत्यारोपणाचा सध्याचा यशस्वी दर काय आहे?
पाश्चात्य जगात फुफ्फुसांच्या प्रत्यारोपणाच्या नंतरचे अस्तित्व एका वर्षात 70%, 3 वर्षांत 45% आणि 5 वर्षांत सुमारे 50% (थोडक्यात, 5 वर्षांपासून फुफ्फुस प्रत्यारोपणाच्या रूग्णांपैकी सुमारे 50%) आहे. पलीकडे जगण्यास सक्षम आहेत). भारतातील यशाच्या दरांची अचूक आकडेवारी वैज्ञानिक साहित्यात उपलब्ध नसली तरी ते पाश्चिमात्य जगाच्या तुलनेत कमी असण्याची शक्यता आहे.

ही पोस्ट शेअर करा: